शिव-सह्याद्री

 —
Rating
Likes Talking Checkins
23 0
About युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मूलाधार सह्याद्रीला "शिव-सह्याद्री" हे Page अर्पण............
Description सरल्या वर्षीच्या शिवराजाभिषेक दिनी छत्रपती शिवरायांना,महाराष्ट्र आधारवड सह्याद्रीला साक्ष ठेवून एक स्वप्न पाहिलेलं…….
स्वप्न होतं शिव-शंभू विचारांच्या जागराचं,जातीभेदापुढचे महाराज समजून घेण्याचं………
सह्याद्री जगण्याचं,फक्त भटकंती पलीकडचा सहयाद्री समजून घेण्याचं………

स्वप्न होतं "शिव-सह्याद्रीचं"……
हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आम्ही ४-५ पाईकांनी……
आठही अंक हजारो वाचकांच्या पसंतीत उतरले…….
शिवरायांच्या प्रशासकीय धोरणांपासून,शंभू महाराजांच्या सत्य इतिहासापर्यंत……
जगावं कसं हे शिकवणाऱ्या तुकोबारायांच्या वैश्विक अभंगापासून,सध्याच्या कायद्यापर्यंत-संविधानापर्यंत……
सह्याद्रीच्या मुलुखगिरीपासून,सह्यगिरीच्या जैवविविधतेपर्यंत……
नागर-हेमाडपंथी शैलींच्या पाषाण मंदिरापासून,जैन-बौद्ध लेण्यांपर्यंत……
गड-किल्ल्यांवर घडलेल्या युद्धांपासून,गड-किल्ल्याचं बांधकाम-शास्त्र इथपर्यंत सगळं मासिकात पूर्ण अभ्यासाअंती मांडलं……

पण मागच्या काही महिन्यात मासिकाचं गाडं काही कारणास्तव अडकलेलं……
गेल्या चार-पाच महिन्याचे अंक येऊ शकले नाही….
कारणंही तशीच होती ती आता उगाळत बसत नाही……
वाईट वाटायचं…….
प्रचंड कष्ट उपसून जे स्वप्न सत्यात उतरवलेलं तेच काळवंडताना पाहून जीवाची तगमग व्हायची……
इच्छा नसूनही सगळ्याचं आघाडयांवर माघार घावी लागत होती…..

विझलेल्या अग्नीवर एखादा वाऱ्याचा हलका झोत फिरावा आणि राखेच्या ढिगाऱ्यात गाडल्या गेलेल्या परत जगू पाहणाऱ्या एखाद्या निखाऱ्याने परत धडधडून पेट घ्यावा तशी माझीही लढण्याची जिद्ध फुलतेय………

काही जुन्या काही नव्या भिडूंना एकत्र घेवून परत "शिव-सह्याद्रीची" मोट बांधतोय……
मासिक परत सुरु करतोय "शिव-सह्याद्री" विचार आभाळभर दुग्गोचर व्हावा यासाठी………


("शिव-सह्याद्री"-डिसेंबर २०१३-अंक नववा
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा:-

https://drive.google.com/file/d/0B2-Xx9acg0_9V1E0U0MyTzY3M1E/edit?usp=sharing )
Share

Reviews and rating

Avatar
Rate this community